...असे आहेत म्हाडाचे नवे ‘उत्पन्न गट’, mhada`s new income group

...असे आहेत म्हाडाचे नवे ‘उत्पन्न गट’

...असे आहेत म्हाडाचे नवे ‘उत्पन्न गट’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

म्हाडाने लॉटरीसाठीच्या उत्पन गटाच्या निकषांमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहे. या नवीन बदलांमुळे लॉटरी विजेत्यांना कर्ज मिळणे सहज शक्य होणार असल्याचा दावा म्हाडाने केलाय.

म्हाडाच्या घरांच्या किंमती गेल्या पाच वर्षात चांगल्याच वाढल्याने जुन्या उत्पन्न मर्यादा कालबाह्य झाल्या होत्या. त्यामुळेच म्हाडाच्या बोर्डाच्या बैठकीत लॉटरीसाठी असलेल्या उत्पन्न गटाच्या निकषांमध्ये हे बदल करण्यात आलेत.

नवीन निकषांनुसार...
 अत्यल्प उत्पन्न गटाची मर्यादा कमाल ८,००० रुपयांवरून १६,००० रुपये करण्यात आली आहे.
 अल्प उत्पन्न गटासाठीची मर्यादाया आधी ८,००० - २०,००० होती आता ती १६,००० - ४०,००० करण्यात आली आहे.
 मध्यम उत्पन गटाची मर्यादा २०,००० - ४०,००० वरून ४०,००० - ७०,००० करण्यात आली आहे.
 उच्च उत्पन्न गटाची मर्यादा ४०,००० रुपयांपेक्षा जास्त होती. आता ती ७०,००० रुपयांच्या पुढे करण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 24, 2013, 22:49


comments powered by Disqus