Last Updated: Tuesday, November 20, 2012, 12:35
www.24taas.com,मुंबईम्हाडाच्या घरांच्या लॉटरीविजेत्यांसाठी थोडीशी वाईट बातमी. मे २०१२मध्ये मीरा रोडमधील म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागलेले ४० टक्के अर्जदार अपात्र ठरलेत.
मीरा रोडच्या घरांसाठीच्या लॉटरीत सोळाशे सोळा अर्जदार यशस्वी ठरले होते. अर्जदारांच्या कागदपत्रांच्या छाननीत ८१९ अर्जदार म्हाडाचे निकष पूर्ण करु शकले.
तब्बल ७१२ अर्जदारांचे अर्ज कागदपत्रांच्या छाननीत बाद ठरले. अर्ज बाद झालेल्या अर्जदारांना १५ दिवसांत अपिल सादर करण्याची मुदत देण्यात आलीये.
First Published: Tuesday, November 20, 2012, 12:34