विरारामध्ये शनिवारी मध्यरात्री लोकलवर दगडफेकीचा थरार, midnight on Saturday throw stones thrills Loca

विरारामध्ये शनिवारी मध्यरात्री लोकलवर दगडफेकीचा थरार

विरारामध्ये शनिवारी मध्यरात्री लोकलवर दगडफेकीचा थरार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विरार स्थानकात शनिवारीमध्यरात्री थरार घटना घडली. विरार स्थानकात १ वाजून ५ मिनिटांनी येणारी लोकल सिग्नल बिघाडामुळे स्थानकाबाहेर ५० मिनिटे उभी राहिली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी लोकलमधून उतरून दगडफेक केल्याची बाब पुढे आली आहे.

विरारमधील ती रात्र आठवली की अंगावर काटा येतो. माझा जीव धोक्यात होता. रेल्वेला प्रवाशांनी घेरले होते. एखाद्या दंगलीसारखीच परिस्थिती विरार स्थानकात शनिवारी मध्यरात्री होती. एक-दोन नव्हे तर शंभर प्रवाशांनी मला घेरले. त्यामुळे यांच्या तडाख्यातून वाचणार कसे, याची चिंता होती, अशी धक्कादायक माहिती मोटरमन रामप्रसाद यांनी सांगत शनिवारचा बाका प्रसंग कथन केला.

दरम्यान, त्याचवेळी आणखी एका लोकलवर दगडफेक रामप्रसाद यांच्या लोकलवरून विरार स्थानकात तणाव निर्माण झालेला असतानाच त्यामागून येणार्‍या आणखी एका विरार लोकलवर प्रवाशांनी दगडफेक केली. विरार स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्मवर येणार्‍या ज्या सिग्नलमुळे समस्या उद्भवली त्याचा फटका आणखी एका लोकलला बसला.

चर्चगेट-विरार स्लो लोकल विरारच्या दिशेने निघाली. मात्र, विरारदरम्यान सिग्नल बिघाडामुळे गाडी थांबविण्याचा निर्णय घेतला गेला. मध्यरात्री एकच्या सुमारास विरार स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर एकच्या दिशेने येणार्‍या सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल प्लॅटफॉर्म नंबर आठवर गेली आणि यामुळे संतप्त प्रवाशांनी हैदोसच घातला होता. तांत्रिक कारणामुळे रेल्वे दुस-या प्लॅटफॉर्म नेल्याने असा जीवावर प्रसंग येण्याचा प्रसंग अनुभवावा लागल्याची खंत मोटरमन रामप्रसाद यांनी व्यक्त केली.

शंभर प्रवाशांनी माझ्या केबिनला घेरले होते आणि प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर ही ट्रेन कशी आणली, असे ते तावातावाने विचारत होते. काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. लोकलवर हल्ला करत तुम्ही बाहेर पडा, तुम्हाला दाखतो. हातवारे करून धमक्या देऊ लागले. ही परिस्थिती पाहता मी खूपच घाबरलो. काय करावे ते सूचन नव्हते. शेवटी मी स्टेशन मास्तरांना फोन करून रेल्वे पोलिसांना बोलावले. मात्र त्यांनाही प्रवाशांनी जुमानले नाही. तीन तासांच्या नाट्यानंतर कशीबशी माझी सुटका झाली, असे सांगून याबाबत रामप्रसाद यांनी रेल्वे प्रशासनाला लेखी माहिती दिली आहे. आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 15:53


comments powered by Disqus