Last Updated: Tuesday, December 24, 2013, 21:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई काँग्रेसचे युवा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय.
‘आदर्श घोटाळ्याच्या चौकशी अहवालात काही प्रश्न उपस्थित झाले असतील, तर आपण त्याचा तपास केला पाहिजे… त्यांची उत्तरं द्यायला हवीत... नुसती कुजबुज नको’ असं मिलिंद देवरा यांनी म्हटलंय.
सोशल वेबसाईट ‘ट्विटर’वर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. त्यांच्या या ट्विटमुळे राज्य सरकारला चांगलंच अडचणीत आणल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, महाराष्ट्राच्या पुरोगामितात्वाचा वारसाजपण्याच्या अनुषंगाने अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सी बी आय ने जी परवानगी मागीतली आहे, त्यावर आपण फेरविचार करावा आणि अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध यांच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी आज राज्यपालांन शंकर नारायण यांना पत्र पाठवून केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 24, 2013, 21:17