राज्यात पुन्हा एकदा दूध महागलं, milk price increase

राज्यात पुन्हा एकदा दूध महागलं

राज्यात पुन्हा एकदा दूध महागलं
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यात पुन्हा एकदा दूध महागलं आहे. गाय आणि म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लिटरमागे आता दोन रूपये जादा मोजावे लागणार आहेत.

महागाईचे चटके सोसणा-या सामान्यांना आता दुध दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. शासकीय दूध योजनेमार्फत खरेदी करण्यात येणा-या दुधाचे दर आणि वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ कऱण्यात येणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे दुधाच्या दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ होणार आहे. या निर्णयामुळे गायीचे दुध आता ३१ ऐवजी ३३ रुपये प्रतिलिटर तर म्हशीचं दूध ४० रुपयांऐवजी ४२ रुपये प्रतिलिटर मिळणार आहे. २५नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Friday, November 22, 2013, 23:21


comments powered by Disqus