आमदार निवासात आत्महत्येचा प्रयत्न, MLA house Suicide Attempt

आमदार निवासात आत्महत्येचा प्रयत्न

आमदार निवासात आत्महत्येचा प्रयत्न
www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासातून एका तरुणानं उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. त्यानं आमदार निवासाच्या दुस-या माळ्यावरुन उडी घेतली.

पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडलीय़े. यामध्ये तो गंभीर जखमी झालाय. शंकर वसाने असं या तरुणाचं नाव आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीचा रहिवासी आहे. जखमी वसानेला जीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आमदार निवासात राहत असल्याने तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने आमदार निवास हे कशासाठी आहे? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे? आत्महत्येचं कारण अद्यापी समजेललं नाही.

First Published: Thursday, December 6, 2012, 16:13


comments powered by Disqus