Last Updated: Monday, February 3, 2014, 16:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईट्रॅफिक पोलीस हवालदार सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरण, अजुनही आमदार क्षितिज ठाकूर यांची पाठ सोडत नाहीय.
या प्रकरणी आता भोईवाडा पोलिस स्टेशनने आमदार क्षितिज ठाकूर, यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावलंय.
या समन्सनुसार आमदार क्षितिज ठाकूर यांना ७ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर रहावं लागेल.
ही नोटीस ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी ही नोटीस ठाणे जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे पाठवतील, यानंतर ही नोटीस संबंधित पोलिस स्टेशनमार्फत क्षितिज ठाकूर यांना बजावण्यात येणार आहे.
सचिन सूर्यवंशी आणि क्षितिज ठाकूर यांच्यात पहिल्यांदा वरळी सी लिंकवर वाद झाला, त्यावेळी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होऊन कारवाईला सुरूवात झाली असती, तर विधानभवनात जो प्रकार घडला, तो टाळता आला असता, अशा आशयाची याचिका संतोष दौंडकर यांनी केली होती.
या याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं आमदार क्षितिज ठाकूर यांना समन्स बजावलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 3, 2014, 15:46