मनसे मोर्चा आयोजकावर गुन्हा दाखल, Mns agitation police complain

मनसे मोर्चा आयोजकावर गुन्हा दाखल

मनसे मोर्चा आयोजकावर गुन्हा दाखल
www.24taas.com, मुंबई

मनसेच्या बहुचर्चित मोर्चा आज निघाला आणि राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवा अध्याय रचला. मनसेने काढलेल्या भव्य मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही ही रॅली काढण्यात आली. आणि आता त्यामुळेच राज ठाकरे यांच्या पक्षाच्या रॅली आयोजकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिरीष सावंत या मनसेच्या रॅली आयोजकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवानगी मोर्चा काढल्याबाबत कलम १३५च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता मनसे यावर काय भुमिका घेणार याकडेच सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

First Published: Tuesday, August 21, 2012, 22:05


comments powered by Disqus