झोपडपट्टी जाळपोळ प्रकरणी मनसे, भाजप आमदारांना अटक, MNS, BJp Mla arrest

झोपडपट्टी जाळपोळ प्रकरणी मनसे, भाजप आमदारांना अटक

झोपडपट्टी जाळपोळ प्रकरणी मनसे, भाजप आमदारांना अटक
www.24taas.com, मुंबई

मुलुंडमधील नीलमनगर झोपडपट्टी तोडफोडप्रकरणी मनसे आमदार शिशिर शिंदे आणि भाजप आमदार तारासिंग यांनी स्वतःला अटक करवून घेतली आहे.

याशिवाय राष्ट्रवादीचे नगरसेवक नंदकुमार वैती आणि किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनीही स्वतःला अटक करवून घेतली आहे. नीलमनगर झोपडपट्टी हटवण्यासाठी झालेल्या आंदोलनाचे या नेत्यांनी नेतृत्व केलं होतं. या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते.

त्यानुसार ही अटक करण्यात आली आहे. मुलुंडच्या रहिवाशांनी केलेल्या आंदोलनात सर्वपक्षिय नेत्यांनी सहभाग घेतला होता. स्थानिकांना त्रास होत असल्यानं त्यांनी झोपडपट्टी हटवली होती. यावेळी परिसरात जाळपोळही करण्यात आली होती.

First Published: Tuesday, January 22, 2013, 13:04


comments powered by Disqus