मनसे नगरसेवकाला मारहाण भोवणार, mns corporator will face consequences

मनसे नगरसेवकाला मारहाण भोवणार

मनसे नगरसेवकाला मारहाण भोवणार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महापालिकेतील दूरसंचार अभियंता राजेश राठोड मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवक गिरीश धानुरकरांना मारहाण भोवणार अशी चिन्ह आहेत...मारहाण प्रकरणी मनसे नगरसेवक गिरीश धानुरकरांना महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंनी धानुरकरांना नोटीस पाठवलीय. त्यामध्ये आपल्याला अपात्र का ठरवू नये असा सवाल विचारलाय. धानुरकरांवर कारवाई करण्यासाठी विधी विभागानं परवानगी दिल्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आलीय.

महापालिका आयुक्त राज्य सरकारकडे धानुरकरांच्या अपात्रतेचा प्रस्ताव पाठवणारेत. १ ऑगस्ट २०१३ ला गिरीश धानुरकरांनी अभियंत्यास मारहाण केली होती. मारहाण प्रकरणी कारवाई झाल्यास धानुरकर महापालिकेतील कारवाई झालेले पहिलेच नगरसेवक ठरतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 30, 2013, 18:02


comments powered by Disqus