Last Updated: Friday, February 22, 2013, 12:35
www.24taas.com, मुंबई आज मुंबईत सेन्ट्रल बँकेच्या क्लार्क पदाची भरती प्रकिया सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणावर एकच गोंधळ उडवून दिलाय. सिद्धार्थ कॉलेजच्यासमोर मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून ही भरती प्रक्रिया उधळून लावलीय.
मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजच्यासमोर सेन्ट्रल बँकेच्या क्लार्क पदाच्या परीक्षा आणि मुलाखतीसाठी आज अनेक उमेद्वार उपस्थित झाले होते. याचवेळी, मनसे नेते शिरीष पारकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धडक दिली. मराठी उमेद्वारांना प्राधान्य देण्याची मागणी करत त्यांनी इथं जोरदार घोषणाबाजी करत परीक्षा उधळून लावली. तसंच परप्रांतीय उमेदवारांनाही या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावलंय.
First Published: Friday, February 22, 2013, 12:33