Last Updated: Tuesday, November 6, 2012, 14:51
www.24taas.com, मुंबईमहागाईचा आगडोंब देशासह राज्यातही उसळला असल्याने सामान्यांचं दिवाळ सणा आधीच दिवाळं निघालं आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई त्यातच जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्याचं बजेट चांगलचं कोसळलं आहे. मात्र दिवाळी सारखा मोठा सण तोंडावर आल्याने सण साजरा करावाच लागतो आहे. मात्र आता सामान्यांसाठी मनसेने एक पाऊल पुढे टाकलं आहे.
मनसेतर्फे ना नफा ना तोटा या तत्वावर किराणा सामानाची विक्री करण्यात येत आहे. मनसेने अनेक ठिकाणी आपल्या आपल्या परिसरातील नागरिकांना जास्त भुर्दंड बसू नये यासाठी दिवाळी सणासाठी लागणारं किराणा सामान घाऊक स्वरूपात उपलब्ध करून दिलं आहे.
सामान्य नागरिकांना त्यामुळे थोडा का होईना पण दिलासा मिळाला आहे. मात्र या महागाईमुळे सामान्य नागरिकही खर्च करताना हात आखडता घेताना दिसत आहे.
First Published: Tuesday, November 6, 2012, 14:43