Last Updated: Wednesday, October 16, 2013, 12:02
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात मनसेनं अविश्वास प्रस्तावाची सूचना दिलीये.
मनसेचे नवनियुक्त गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौर सुनिल प्रभू यांना याबाबत पत्र पाठवलंय.
मुंबईत होणाऱ्या इमारत दुर्घटना, महापालिक रुग्णालयांची दुरवस्था तसंच रस्त्यांवर असलेले खड्डे, कचऱ्याचे ढिगारे, शालेय वस्तू घोटाळा यासारख्या समस्या सोडवण्यात आयुक्त अपयशी ठरल्याचा ठपका मनसेनं ठेवलाय. मुंबई महापालिकेच्या इतिहासात ही एक दुर्मिळ घटनाच मानली जातेय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 16, 2013, 12:02