Last Updated: Wednesday, February 19, 2014, 14:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदार आणि नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे.
मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक आहे.
राज ठाकरे यांच्यासह विधानसभा गटनेते बाळा नांदगावकर, आमदार नितीन सरदेसाई, शिशीर शिंदे, राजन शिरोडकर बैठकीला उपस्थित आहेत.
याआधी राज ठाकरे यांनी जिल्हा पदाधिका-यांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मते जाणुन घेतली होती.
टोल आंदोलनानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे काय भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 19, 2014, 14:36