मनसेचे दरेकर निलंबित, CM ला शिवीगाळ!, mns mla pravin darekar suspended

मनसेचे दरेकर निलंबित, CM ला शिवीगाळ!

मनसेचे दरेकर निलंबित, CM ला शिवीगाळ!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मनसे आमदार प्रविण दरेकर यांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांना शिविगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीये.

मुंबईवरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. यावेळी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. यावेळी दरेकर यांनी अपशब्द वापरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

दरम्यान, दरेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळलेत. आपण शिविगाळ केलेली नसल्याचं ते म्हणाले. विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार असून अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 26, 2013, 17:17


comments powered by Disqus