मनसेचा `राडा`, पोलिसांना घातला आधीच `खोडा` , Mns on saregamapa show

मनसेचा `राडा`, पोलिसांनी घातला आधीच `खोडा`

मनसेचा `राडा`, पोलिसांनी घातला आधीच `खोडा`
www.24taas.com, मुंबई

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह तिघांना मुंबई पोलिसांकडून चांगलीच तंबी देण्यात आली. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष`सारेगमप` या शोचं शूटिंग बंद पाडण्याचा प्रयत्नात आहेत, अशी माहिती एन.एम. जोशी पोलिसांना मिळाली.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची `उठाठेव` करू नये यासाठीं पोलिासांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाचारण केलं होतं.`सारेगमप` या रियालिटी शोमध्ये पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असल्याने मनसेचा याला विरोध आहे. त्यामुळेच शोचं शूटिंग आज संध्याकाळी बंद पाडण्याच्या प्रयत्नात अमेय खोपकर होते.

पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना तंबी देण्यात आल्याचे समजते. याआधी `सूरक्षेत्र` या कलर्स वाहिनीवरच्या कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने विरोध केला होता.

First Published: Thursday, October 18, 2012, 13:27


comments powered by Disqus