Last Updated: Thursday, February 21, 2013, 11:49
www.24taas.com, मुंबईएफडीएच्या धोरणांविरोधात राज्यातल्या केमिस्टनी पुकारलेल्या आंदोलनाला मनसेनं जोरदार विरोध केलाय. हे आंदोलन मोडून काढण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. हे आंदोलन आपणहून थांबवलं नाही, तर मनसेच्या पद्धतीनं आंदोलन मोडून काढण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.
या संदर्भात आज मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी एफडीए आयुक्तांना भेटणार आहे. दुकानांमध्ये प्रशिक्षित फार्मसिस्टची उपस्थिती बंधनकारक करणाऱ्या एफडीएच्या नियमाविरोधात औषध विक्रेत्यांनी ८ तास काम आंदोलन पुकारलं आहे.
यामुळे संध्याकाळी ६ वाजता शटर डाऊन करण्याचं आंदोलन सुरू आहे. सरकारनं 2 दिवसांत निर्णय न घेतल्यास संपूर्ण बंद पुकारण्यात येईल, असा इशारा केमिस्ट अंड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.
First Published: Thursday, February 21, 2013, 10:42