mns preparation for morcha, 24taas.com

मोर्चा काढणारच; मनसे व्यूहरचनेत दंग

मोर्चा काढणारच; मनसे व्यूहरचनेत दंग
www.24taas.com, मुंबई
गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे मंगळवारी म्हणजेच उद्या मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी मनसे विशेष व्युहरचना करण्यात व्यस्त आहे.

मुंबईतला हिंसाचार हाताळण्यात गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त अपयशी ठरल्याचा मनसेचा आरोप आहे. आर. आर. पाटील गृहखातं सांभाळण्यास सक्षम नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज यांनी केलीय. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उद्या दुपारी गिरगाव चौपाटीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आसामच्या मुद्यावर राज ठाकरे बरसले आहेत.

सीएसटीचा हिंसाचार हा केवळ पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी करण्यात आला होता असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. त्याचबरोबर त्यांनी गृहखातं मुंबईतला हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही केलाय. दरम्यान, राज्यात सण उत्सव आणि तणावाची परिस्थिती असताना ही मोर्चा काढण्याची वेळ योग्य नसल्याचा टोला रविवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना लगावला होता. तसंच मोर्चा काढणारच असतील तर त्यांना रोखणार नाही असंही त्यांनी काल स्पष्ट केलं होतं.

First Published: Monday, August 20, 2012, 12:46


comments powered by Disqus