शिवसेनेच्या `कानडी साबणा`वर मनसे घसरली MNS slams Shiv Sena for Soap purchasing

शिवसेनेच्या `कानडी साबणा`वर मनसे घसरली

शिवसेनेच्या `कानडी साबणा`वर मनसे घसरली
www.24taas.com, मुंबई

मुंबई मनपाला मनसेने पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. मनपा कर्मचाऱ्यांसाठी मनपाने कर्नाटकातून साबण खरेदी केला आहे. सीमाभागात मराठी जनतेवर अन्याय करणाऱ्या कर्नाटकातून शिवसेनेने साबण विकत घेऊन आपलं मराठी प्रेम खोटं असल्याचं दाखवून दिलं आहे, अशी टीका मनसेने केली आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन, मलनिःसारण वाहिनी खात्यातील कामगारांना स्वच्छतेसाठी दरवर्षी साबण देत असते. यावर्षी देण्यात येणारे साबण हे मे. कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड या कंपनीला देण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. या निर्णयावरच मनसेने टीका केली आहे. हे कंत्राट २ कोटी ३ लाख रुपयांचं आहे. मनसे गटनेते यांनी शिवसेनेला धारेवर धरत जे राज्य मराठी लोकांवर अन्याय करतं, त्यांच्याकडून साबण खरेदी करत शिवसेना आपलं मराठी प्रेम खोटं असल्याचं सिद्ध करत असल्याचं म्हटलं आहे.

मात्र कर्नाटक साबण अंड डिटर्जंट कंनीने सर्वांत कमी बोली लावल्यामुळे त्यांनाच कंत्राट मिळण्याची शक्यता असल्याचं मुंबई मनपाचं म्हणणं आहे. कर्नाटकातील कंपनीशी व्यवहार करताना कर्नाटक सरकारची परवानगी मागितली आहे. मात्र या गोष्टीला सव्वा वर्ष उलटून गेलं अशून अजूनही कर्मचाऱ्यांना साबण मिळालेला नाही.

First Published: Tuesday, February 19, 2013, 16:50


comments powered by Disqus