Last Updated: Thursday, March 7, 2013, 16:22
www.24taas.com, मुंबईप्राध्यापकांचे आंदोलन सुरु असताना युवासेना आणि मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिलीये. महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केलीये. तसेच एफवाय, एसवायच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्य़ाचीही मागणी मनसेनं केलीये.
दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बंद पाडणा-या प्राध्यापकांवर कारवाईची मागणी युवासेनेनं केलीये. प्राध्यापक अनेक केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा बंद पाडतायेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. राज्यातल्या 8 विद्यापीठांमधील प्राध्यापकांनी महाविद्यालयीन परीक्षांवर टाकलेल्या बहिष्कारामुळं अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्यात. टीवायबीएसस्सीच्या पॅक्टिकलच्या 77 केंद्रांवर आत्तापर्यंत परीक्षा होऊ शकल्या नाहीत. आज दादरच्या रुपारेल महाविद्यालयात टीवायबीएसएस्सीची प्रॅक्टीकलही होऊ शकली नाही.
आज एकूण 84 केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत. तर एफवाय आणि एसवायच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्यात. त्यामुळं लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. प्राध्यापकांच्या हेकेखोर वृत्तीमुळं विद्यार्थी वेठीला धरले जातायेत. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
First Published: Thursday, March 7, 2013, 16:17