Last Updated: Monday, October 15, 2012, 19:12
www.24taas.com, मुंबईमुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मनसे तर्फे रास्ता रोको करण्यात आला होता. कांजुरमार्ग डंम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मनसेनं रास्ता रोको केला होता.
रास्ता रोको केल्याने ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे जाम झाला होता. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी हा रास्ता रोको आंदोलन थांबविण्यासाठी मनसे आमदार शिशिर शिंदे, मंगेश सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मात्र त्यांची सुटका करणार की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे कांजूरमार्ग डंम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मात्र चांगलाच चिघळणार असे दिसते आहे.
First Published: Monday, October 15, 2012, 19:01