विद्यापीठावर मनविसेचा झेंडा... , mns win over student council of mumbai university

विद्यापीठावर 'मनविसे'चा झेंडा...

विद्यापीठावर 'मनविसे'चा झेंडा...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अखेर मुंबई विद्यापीठाच्या ‘स्टुडंट काऊन्सिल’वर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपला झेंडा फडकावण्यात यशस्वी ठरलीय.

मुंबई विद्यापीठाच्या ‘स्टुडंट काऊन्सिल’च्या अध्यक्षपदी ‘मनविसे’च्या रेश्मा पाटील तर सचिवपदी ‘मनविसे’च्याच पियुष झेंडे याची निवड जालीय. दोन्ही पदांवर मनविसेचेच उमेदवार निवडून आल्यानं गटात एकच उत्साह दिसून येतोय.

या निवडणुकीत मनसेला ९ मतं तर नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाला ५ मतं प्राप्त झाली. स्टुडंट कौंन्सिलसाठी आज मतदान पार पडलं. मनविसे आणि ‘एनएसयूआय’मध्ये ही लढत रंगली होती.

घोडाबाजार आणि राजकीय दबावाचा आरोप करत या निवडणुकीवर बहिष्काराची भाषा करणा-या ३ जीआरनी ऐनवेळी निवडणुकीला हजेरी लावली. यापैकी परळच्या एम डी कॉलेजची भाग्यश्री सावंत आणि गोरेगावच्या पटेल कॉलेजची तृप्ती येडेकर यांनी मनविसेला मतदान केलं. हर्षदा तोरसकर या वेंगुर्ल्याच्या कॉलेज प्रतिनिधीनं 'एनएसयूआय'ला मत दिलंय. असं काय झालं, की ज्यामुळे या तिघींचं मतपरिवर्तन झालं? त्यांनी अचानक मतदानाला हजर राहण्याचा निर्णय कशामुळे घेतला? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 15, 2014, 18:06


comments powered by Disqus