मनसे कार्यकर्त्याचे दुष्कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, MNS Worker rape on immature girl

मनसे कार्यकर्त्याचे दुष्कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मनसे कार्यकर्त्याचे दुष्कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
www.24taas.com, मुंबई

मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समजते आहे. अनेकवेळा मुलीवर जबरदस्ती करून त्याने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आणि त्याच्या दुष्कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती झाली आहे. गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर आरोपी करीम बुद्धम मोमिन (३५) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीची बहिण नसीमा आणि इतरांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या बहिणीने १६ वर्षीय पिडीत मुलीला एका रिसॉर्टवर नेऊन तिचा गर्भपात करण्यासाठी आणि बलात्कार झाल्याचे विसरून जाण्यासाठी पैसे देऊ केले होते. आरोपी घाटकोपरमधील नित्यानंद नगरमधील रहिवासी आहे. आणि तो विवाहीत देखील आहे. त्याचा १८ वर्षीय मुलगा वाहतूक सेना कार्यकर्ता आहे.

पीडित मुलगी वाहतूक सेनेच्या कार्यालयात गेल्या दोन वर्षापासून काम करीत होती. तिथेच आरोपीची त्या मुलीवर नजर पडली. तिला फूस लावून त्याने तिच्यावर बलात्कार केला. आणि ती गर्भवती झाल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचही वचन तिला दिलं. पण नंतर आरोपी आणि तिच्या बहिणेने तिला गप्प राहण्याची धमकीही दिली.

त्या लोकांच्या या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने विक्रोळी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पण तिची तक्रार स्वीकारण्यापेक्षा पोलिसांनी हा विषय आपआपसात सोडवून टाका असा सल्ला मुलीला दिला. त्यानंतर पीडित मुलीने स्वाभिमान संघटनेशी संपर्क साधला, आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

First Published: Friday, December 7, 2012, 17:07


comments powered by Disqus