Last Updated: Wednesday, October 24, 2012, 15:38
www.24taas.com, मुंबई मुंबईतमध्ये अंधेरी भागात मॉडेलिंग क्षेत्रातील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडालीय.
विदूषी दास असं या मॉडेलचं नाव आहे. तिचा मृतदेह अंधेरीतल्या डी. एन. नगरमधल्या एका आलिशान फ्लॅटमध्ये आढळलाय. विदूषीने आत्महत्या केली? तिची हत्या झालीय याबाबत मात्र पोलिसांमध्ये अजूनही संभ्रम आहे. अंधेरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून विदूषीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय. शवविच्छेदन अहवालानंतर विदूषीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
First Published: Tuesday, October 23, 2012, 13:47