Last Updated: Friday, October 26, 2012, 20:09
www.24taas.com, मुंबईमॉडेल, मिस चेन्नई आणि दाक्षिणात्य अभिनेत्री बिदुषी बर्डे हीच्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. बिदुषी मॉडेल आणि अभिनेत्री होतीच... मात्र त्याचबरोबर ती वेश्याव्यवसाय करीत असल्याचे समोर आल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. बिदुषीचा मृतदेह अंधेरीतील डी.एन.नगर परिसरातील मनीष गार्डन फ्लॅटमध्ये सापडला होता.
पोलिसांनी बिदुषीचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स शोधून काढले आहेत. कॉल रेकॉर्ड डिटेल्समध्ये काही नंबरहून अश्लिल मेसेज रिसिव्ह झाल्याचे समोर आले आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिदुषीच्या मोबाईलमधून मिळालेल्या एका नंबरवर कॉल केल्यानंतर तो एजंट असून हायक्लास कॉल गर्ल्स सप्लाय करत असल्याचे उघड झाले आहे.
तर दुस-या नंबरवरुन आलेल्या अश्लिल एसएमएसवरुन तो कॉलर बिदुषीला ब्लॅकमेल करत असल्याचे समजते. याव्यतिरिक्त अन्य एसएमएस पाहून पोलिसांनी कास्टिंग काऊचचीही शक्यता वर्तवली आहे.
First Published: Friday, October 26, 2012, 19:58