मोदींच्या वक्तव्याने शिवसेनेला गुदगुल्या, Modi`s speech on Hindu

मोदींच्या वक्तव्याने शिवसेनेला गुदगुल्या

मोदींच्या वक्तव्याने शिवसेनेला गुदगुल्या
www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली

भाजपचे नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाचे वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेकडून मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ‘देशाच्या नेतृत्वाची ढाल एका हिंदुत्ववादी नेत्याच्या हातातच असली पाहिजे’ हे शब्द नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचे समर्थन करणारे आहेत असे शिवसेनेकडून स्षष्ट करण्यात आलेय.

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदींचे स्वागत केले आहे. देशाच्या कर्तव्याची ढाल ही एका हिंदुत्ववादी नेत्याच्याच हाती असली पाहिजे, असे आमचे प्रबळ मत बाळासाहेबांच्या वेळेपासूनच आहे. मोदींच्या या भूमिकेचा राष्ट्राला नक्कीच फायदा होईल. दरम्यान, मोदींच्या एका मुलाखातीतील ‘मी जन्मजात हिंदू असल्याने मी राष्ट्रवादी हिंदू आहे’ या ओळीवर आधी खासदार राऊत यांनी आक्षेप घेतला होता.

मी राष्ट्रवादी हिंदू आहे. मी देशभक्त आहे, मी जन्मत: हिंदू आहे, मी एक राष्ट्रवादी हिंदू आहे आणि यामध्ये काहीही गैर नाही. त्यामुळेच तुम्ही मला राष्ट्रवादी हिंदू बोलू शकता कारण, माझा जन्मच हिंदू म्हणून झाला आहे, असे वक्तव्य मोदींनी केलेय.

राऊत यांनी मोदींच्या वक्तव्याची प्रशंसा करताना म्हटले की, यापूर्वी ठाकरेंद्वारे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणे म्हणजे गुन्हा मानला जायचा. त्यामुळेच हिंदूत्व हा राष्ट्रवादाचा आणखी एक चेहरा असल्याचंही राऊत म्हणालेत.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.



First Published: Saturday, July 13, 2013, 13:33


comments powered by Disqus