मुंबईत पकडलेल्या ट्रकमध्ये अकरा कोटी , money four trucks in mumbai

मुंबईत पकडलेल्या ट्रकमध्ये अकरा कोटी

मुंबईत पकडलेल्या ट्रकमध्ये अकरा कोटी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर टाकण्यात आलेल्या धाडीत हस्तगत झालेली रोकड केवळ ११ कोटी रूपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रक पकडल्यानंतर आयकर विभागाने पैशांची मोजदाद सुरू केली होती, ती संपली. या ट्रकमध्ये २००० कोटी रूपये असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, गुजरातकडे ही रोकड नेण्यात येणार होती. ट्रकमध्ये पैशाशिवाय सोने, दागिने तसेच हिरे होते. हा सर्व माल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. तर याचवेळी रिझर्व्ह बँकेतल्या अधिकार्यांनमार्फत नोटांची चाचपणीही करण्यात आली. मात्र यातून बनावट नोटांचे प्रकरणही पुढे आलेले नाही.

पैशाची मोजदाद झाली असून रोकड ११ कोटी रूपये असल्याचे स्पष्ट झालेय. आता दागिन्यांची मोजदाद सुरू झाली आहे. ती आज पूर्ण होईल, असे आयटी अधिकार्यां चे म्हणणे आहे. दरम्यान, कालपासून धाडीत पकडला गेलेला आपापला मुद्देमाल सोडविण्यासाठी अंगडीया, संबंधित व्यापार्यांानी बॅलार्ड पिअर येथील सिंधीया भवन येथील आयटी कार्यालयात गर्दी केली होती.

सुमारे १५० अंगडीया, व्यापारी आतापर्यंत पुढे आल्याची माहिती मिळते. या सर्वांनी कागदपत्रे, चलन, पावत्या आयटी अधिकार्यां कडे सुपुर्द केल्या आहेत. आयटीचे महासंचालक स्वतंत्रकुमार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, धाडीदरम्यान कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. एनआयए याप्रकरणी आता कोणताही तपास करीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 4, 2013, 11:30


comments powered by Disqus