मोनिकाला मदतीचा ओघ; रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, monica more getting help; zee media initiati

मोनिकाला मदतीचा ओघ; रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मोनिकाला मदतीचा ओघ; रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

घाटकोपरच्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आर्थिक मदत करण्याचं आवाहन ‘झी मीडिया’नं केलं होतं. ‘झी मीडिया’च्या या आवाहनाला समाजातल्या सर्वच स्तरांतून प्रतिसाद मिळतोय.

आत्तापर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त मदत मोनिकाला उपलब्ध झालीय. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाही मोनिकाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही दोन लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. तसंच मुंबईच्या बाहेरच्या व्यक्तींनीही मोनिकाच्या बॅँक अकाऊंटमध्ये रक्कम जमा केलीय.

हायकोर्टानं घेतली दखल
दुसरीकडे मोनिकाच्या अपघाताची हाय कोर्टानेही दखल घेतलीय. कोर्टानं रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावलीय. तसंच सेंट्रल-वेस्टर्नच्या डीआरएम यांनाही कोर्टानं नोटीस दिलीय. एसएनडीटीची विद्यार्थिनी असलेल्या मोनिकाचा घाटकोपर रेल्वे स्टेशनवरील खड्ड्यामुळं अपघात झाला होता.

रेल्वे अधिकाऱ्यांवर फोडलं खापर
दरम्यान, मोनिका मोरे अपघात प्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोनिका मोरे हिचे वडील अशोक मोरेंच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. गुरुवारी, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 17, 2014, 17:27


comments powered by Disqus