Last Updated: Tuesday, March 5, 2013, 16:11
www.24taas.com ,नवी दिल्ली देशात एड्स रुग्णांच्या सर्वाधिक संख्येत आर्थिक मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे मुंबईत एड्सबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते. याच आर्थिक राजधानीत एड्स बाधितांची संख्या देशात जास्त आहे. मुंबईत एड्सचे सर्वाधिक २४,०१८ रूग्ण आहेत.
केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री एस गांधी सेल्वन यांनी आज राज्यसभेत माहिती देताना सांगितले की, एड्सची संख्या मुंबईत जास्त आहे. तर त्यानंतर नंबर लागतो तो पुण्याचा. पुण्यात १५, १३२ एवढी संख्या असून हैदराबादचा तिसरा क्रमांक देशात लागतो. हैदराबादमध्ये १३,५३२ एड्सचे रूग्ण आढळून आलेत.
First Published: Tuesday, March 5, 2013, 15:44