Last Updated: Sunday, December 9, 2012, 09:10
www.24taas.com,मुंबईमुलांवर आपला धर्म लादण्याचा पालकांना अधिकार नसल्याचे परखड मत व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी एका तीन वर्षीय मुलीचा ताबा तिच्या ख्रिश्चचन पित्याकडे सोपविण्यास नकार दिला.
ख्रिश्चन पिता आणि हिंदू आईचे अपत्य असलेल्या या तीन वर्षांच्या मुलीचे रोमन कॅथलिक धर्मानुसार संगोपन करायचे असल्याने तिचा ताबा आपल्याला मिळावा, अशी विनंती करणारा अर्ज या मुलीच्या पित्याने केला होता. मात्र हा अर्ज फेटाळून लावणाऱ्या न्यायमूर्ती रोशन दळवी यांनी मुलांना धर्माच्या भांडणात न ओढण्याची तंबीही दिली.
पत्नीचा खून करून तुरुंगात जाणार्यां माणसाने धर्माच्या बाता करू नयेत. ज्या धर्माची शिकवण मुलीला मिळावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे त्या ख्रिश्चधन धर्माला याने केलेली हिंसा मान्य नाही. मग मुलीवर ख्रिश्चखन धर्माचे संस्कार व्हावेत अशी मागणी करण्याचा तरी त्याला काय अधिकार, असा सवालही न्यायमूर्ती रोशन दळवी यांनी केला.
First Published: Sunday, December 9, 2012, 09:10