Last Updated: Monday, January 28, 2013, 16:35
www.24taas.com, मुंबई एकीकडे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत असतानाच आता खासदारही महिलांना धमकवण्यात मागे नसल्याचं दिसून येत आहे. नारायण राणे यांचा मुलगा आणि खासदार निलेश राणे याने एका महिला वॉर्डनला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
नीलेश राणे शुक्रवारी मुंबईतील खार परिसरात आले होते. तेथील नो पार्किंग परिसरात त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा पार्क केला. या गोष्टीला ट्रॅफिक वॉर्डन अनिता लोबो यांनी विरोध केल्यावर निलेश राणे यांनी लोबो यांना धमकावलं. तसंच, त्यांच्या अंगरक्षकांनीही शिवीगाळ केली.
खार पोलीस स्टेशनला नीलेश राणेंविरोधात लोबो यांचा कबुलीजवाब घेण्यात आला आहे. गेली अनेक वर्षं मुंबई पोलिसांसाठी वॉर्डनची मोफत सेवा देणाऱ्या अनीता लोबो यांच्यासोबत झालेली वर्तणूक निंदनीय असल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी रझा अकादमीच्या काही कार्यकर्त्यांनीही महिला पोलिसांशी असभ्य वर्तन करत मारहाण केली होती.
First Published: Monday, January 28, 2013, 16:08