`डॅटा करप्ट झाला नाव्हता तर केला गेला होता`, MPSC DATA WAS CORRUPTED BY COACHING CLASSES

`डॅटा करप्ट झाला नव्हता तर केला गेला होता`

`डॅटा करप्ट झाला नव्हता तर केला गेला होता`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एमपीएससी परीक्षांच्या झालेल्या घोटाळ्याबाबत आता नवी माहिती समोर आलीय. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी काही कोचिंग क्लासेस, विद्यार्थी यांनी डेटा करप्ट केल्याची तक्रार एमपीएससी प्रशासनाने आयुक्तालयात केलीय.

राज्य लोकसेवा आयोगाची ७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा वेबसाईटवरचा सगळा डेटा करप्ट झाल्यामुळे पुढे ढकलली गेली होती. अखेर, १८ मे रोजी ही परीक्षा झाली. पण, सगळ्या गोंधळानंतर ‘हा डेटा करप्ट झालाच नव्हता तर केला गेला होता... काही खाजगी कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हे कारस्थान रचलं होतं’ अशी तक्रार आता एमपीएससीनं केलीय. एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती एका खासगी वृत्तवाहिनीला दिलीय.

एमपीएससीची सुरक्षा भेदून डेटा कसा करप्ट झालाच कसा? याचं कारणं शोधण्याकरिता एक समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या तपासात ही धक्कादायक माहितीसमोर आलीय. आता हे उपद्व्याप करणारे कोण आहेत? याचा शोध सुरू झालाय. यासाठी एमपीएससीनं सायबर सेलकडे तक्रारदेखील दाखल केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 15:37


comments powered by Disqus