Last Updated: Wednesday, April 3, 2013, 14:01
www.24taas.com, मुंबईएमपीएससीचा सर्व्हर क्रॅक झाल्यामुळे लाखो विद्यार्थी बेजार झाले असताना आता मनसे विद्यार्थ्यांच्या बाजूनं रस्त्यावर उतरली आहे. MPSCच्या मुंबई कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं.
विद्यार्थ्यांची गैरसोय होत असताना परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मनसेनं यावेळी केलीये. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनंही आंदोलन करून MPSCला इशारा दिला आहे.
दुसरीकडे MPSC परीक्षा वेळेतच घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आधीच वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत तर दुसरीकडे परीक्षा कधी होणार याबाबत मात्र विद्यार्थीहा साशंक झाले आहेत.
First Published: Wednesday, April 3, 2013, 13:52