मनसेचा 'वेस्टर्न एक्सप्रेस हायवे'वर राडा, MSN prevented Western Express

मनसेचा 'वेस्टर्न एक्सप्रेस हायवे'वर राडा

मनसेचा 'वेस्टर्न एक्सप्रेस हायवे'वर राडा
www.24taas.com,मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रस्ता रोको केला. यावेळी आंदोनलकांनी गाड्याची तोडफोड केली.

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं मालवाहतूकदारांविरोधात वांद्र्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रमाणित वजनापेक्षा जास्त मालवाहतूक करणा-या वाहतूकदारांवर कठोर कारवाई न करणा-यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.

हाजी अराफात शेख यांच्या नेतृत्वाखाली वाहनचालक आणि मालक यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हा मोर्चा होता. या मोर्चा वेळी मनसेच्या कार्यकर्त्यानी वेस्टर्न एक्सप्रेस हाइवे वर रस्ता रोको केला त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबळी होती.


या मोर्चात आमदार राम कदम, बाळा नांदगावकारदेखील सहभागी झाले होते. या रस्ता रोकोच्यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन गाड्यांच्या काचा फोडल्या. आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले होते.

First Published: Thursday, January 31, 2013, 15:39


comments powered by Disqus