Last Updated: Sunday, November 11, 2012, 16:49
www.24taas.com,मुंबई उद्योगपती मुकेश अंबानी यांचा काळा पैसा स्वीस बॅंकेत ठेवण्यात आला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर अंबानी यांचा काळापैसा त्वरीत भारतात आणावा आणि सरकारकडे सोपवावा, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांकडून केली. यावेळी काही कार्यकर्ते अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर निदर्शने केली. तसंच एचएसबीसीच्या मुंबईतील विविध शाखांसमोर ही इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि जोरजोरात घोषणाही दिल्या.
केजरीवाल यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत अंबानी यांनी ‘ एचएसबीसी ‘ बँकेमार्फत स्वीस बँकेत काळापैसा ठेवल्याचा खळबळजनक आरोप केला होता. दरम्यान, मुकेश अंबानी आणि एचएसबीसी बँकेने केजरीवाल यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत.
First Published: Sunday, November 11, 2012, 16:49