स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक Mulla arrested for raping his own daughter

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक
www.24taas.com, मुंबई

मुंबईमध्ये एक मौलवी आपल्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या मौलवीला अखेर अटक करण्यात आली आहे.

आरोपी मौलवीलाला सात मुली आणि दोन मुलं आहेत. त्यातील १५ वर्षांच्या पाचव्या मुलीवर मौलवी गेले वर्षभर बलात्कार करत होता. मुलगी वडिलांकडे विनवणी करत असूनही तिला मारून टाकण्याची धमकी देत मौलवी तिच्यावर वारंवार बलात्कार करत राहीला. ही गोष्ट तिने आपल्या आईलाही सांगितली होती. मात्र कुणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं.

अखेर शेजारी राहाणाऱ्यांची मदत घेत मुलीने मौलवींविरोधात विक्रोळी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला. यानंतर आरोपी मौलवीला अटक करण्यात आली आहे. त्याला सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.

First Published: Tuesday, February 5, 2013, 16:03


comments powered by Disqus