मुंबईत तरुणीवर प्राणघातक हल्ला! Mumbai- Attack on Lady again in Mumbai, Goregaon station

मुंबईत तरुणीवर प्राणघातक हल्ला!

मुंबईत तरुणीवर प्राणघातक हल्ला!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबई गँगरेप आणि अमेरिकन महिलेवरील लोकलमधील हल्ल्याचं उदाहरण ताजं असतांनाच पुन्हा मुंबईत असा प्रकार घडलाय. मुंबईत मुंबईत गोरेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका युवतीवर हल्ला झाला आहे.

रुपाली श्रीराम शिंदे असं या २८ वर्षीय तरूणीचं नाव आहे. नालासोपारातील जय अंबे निवास, पाच अंबा पाडा इथं राहणारी ही तरुणी सोमवारी रात्री पावणे आठच्या सुमारास रुपाली गोरेगाव प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर विरार लोकल ट्रेनमध्ये चढत असताना गर्दीत अज्ञात एका व्यक्तीनं तिच्यावर धारदार हत्यारानं प्रहार केला.

हल्ल्यात तिच्या कपाळावर मार लागला आणि जखमी झालीय. गाडी चालू झाल्यामुळं ती मैत्रिणी सोबत गाडीत चढून गेली. मात्र दहिसरला रेल्वे पोलिसांनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं नालासोपारात उतरून उपचार घेण्याचा आग्रह धरला.

नालासोपारातील रेल्वे पोलिसांनी तिला अलायन्स रुग्णालयात दाखल केलंय. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती गोरेगांव इथं एका खाजगी कंपनीत काम करते. ती नालासोपारातील आपल्या बहीणीकडे राहत होती.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 08:18


comments powered by Disqus