Last Updated: Friday, February 7, 2014, 22:08
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईयासिन भटकळचा खळबळजनक दावा. १३ जुलै २०११ ला दादरमध्ये केलेल्या स्फोटात यासिन भटकळला पोलीस व्हॅन पोलिसांसकट उडवायची होती, असा खळबळजनक खुलासा झालाय.
ATSमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊसचे स्फोट प्रेशर कुकर बॉम्बच्या सहाय्यानं करण्यात आले होते. त्यासाठी लागणारं साहित्य यासिननं मंगळूरमधून विकत घेतलं होतं. यासिननं स्वतः दादर, कुलाबा मार्केट, पोलिस महासंचालक कार्यालय, गोल देऊळ, मुंबादेवी, क्रॉफर्डमार्केट, सीपी ऑफीस, अंधेरीचं मॅकडोनाल्ड्स इथली रेकी केल्याची माहितीही भटकळनं दिलंय.
इतकंच नाही, तर स्फोटानंतर लगेच भटकळ आणि असातुल्ला अख्तर हे एटीएस ऑफीसच्या जवळ असलेल्या हबीब मॅन्शनमध्ये राहिल्याचाही धक्कादायक खुलासा झालाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 7, 2014, 22:08