मुंबईकर पित आहेत, दूषित पाणी ! , Mumbai contaminated water

मुंबईकर पित आहेत, दूषित पाणी !

मुंबईकर पित आहेत, दूषित पाणी !
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

पावसाळ्याला सुरूवात झाली की दुषित पाणीपुरवठा ही मुंबईकरांची नेहमीचीच डोकेदुखी झालीय. मात्र यंदापासून या डोकेदुखीत वाढच झालेली दिसून येतेय. शहरातल्या विविध भागात घेतलेल्या वॉटर सँपल्समधली २६ टक्के सँपल दूषित आढळली आहेत.

चार पैकी एक सँपल दूषित असल्याचं आढळून आलंय. विशेष म्हणजे गेल्यावर्षी १६ टक्के सँपल दूषित आढळली होती. यावर्षी त्यात तब्बल १० टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या २६ टक्क्यांवर पोहोचलीय. राज्य वैद्यकीय प्रयोगशाळेत ही तपासणी झाली. त्यात आढळलेली माहिती धक्कादायक आहे.

शहर भागात गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढ झालीय. तर ग्रामीण भागात २० टक्क्यांनी वाढ झालीय. मुंबईच्या विविध भागातली ५,१७७ सँपल्सची चाचणी झाली. त्यातली १३५६ सँपल्स दुषित मिळालीय.

मुंबई शहर हे दूषित पाणीपुरवठ्याच्या तुलनेत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर जालना आहे. या प्रकारामुळे मुंबईकरांमध्ये साथीच्या आजारांची संख्या वाढली आहे. पाईपलाईनमधलं लिकेज आणि अनेकवेळा फुटलेल्या पाईपलाईनमुळे हे प्रकार उदभवत आहेत असं पाहाणीत आढळलंय.

दरम्यान, मुंबईच्या दादर, नायगाव, घाटकोपर, कुर्ला, माझगाव या विभागात सर्वाधिक दुषित पाणी मिळालंय. या विभागांवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की लोकसंख्येची सर्वाधिक जास्त घनता याच भागात आहे. याचाच अर्थ या भागात दुषित पाणीपुरवठा झाल्यामुळे रोगराईचा फैलाव सर्वाधिक होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013, 16:23


comments powered by Disqus