सट्ट्याची नशा: भावानंच केला भावाचा खून!, Mumbai diamond trader`s son killed by cousin over IPL betting losses

सट्ट्याची नशा: भावानंच केला भावाचा खून!

सट्ट्याची नशा: भावानंच केला भावाचा खून!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयपीएलमध्ये सट्टेबाजीच्या नशेपायी एकानं आपल्या चुलत भावलाच किडनॅप करून त्याची हत्या केलीय. मुंबई पोलिसांनी बुधवारी या घटनेचा खुलासा केल्यानंतर सगळेच जण चक्रावले.

मुंबई पोलिसांनी बुधवारी एक पत्रकार परिषदेदरम्यान या घटनेचा खुलासा केलाय. १३ मे रोजी मुंबईच्या एका हिरे व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी २० लाखांची मागणी केली होती. अपहरण करण्यात आलेल्या मुलाचं नाव आदित्य रांका असून तो १३ वर्षांचा होत्या. अपहरणकर्त्यांनी त्याचा निर्दयीपणे हत्या केलीय.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या अपहरणला हिरा व्यापाऱ्याच्या पुतण्यान हिमांशुनं त्याच्या विजय या मित्रासोबत हा डाव रचला होता. पण, जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं तेव्हा घाबरून आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी अगोदर अपहृत मुलाच्या हाताची नस कापून टाकली आणि त्यानंतर त्याला जिवंत जाळलं.

पोलिसांसमोर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलाय. पोलिसांच्या माहितीनुसार, हिमाशू आणि आदित्य हे दोघेही आयपीएल मॅचवर लागलेला सट्टा हरले होते. १० लाख रुपये देण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. यासाठीच त्यानं आपल्या चुलत भावाचं अपहरण केलं होतं. यासाठी त्याला विजयनंही मदत केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 15, 2013, 14:32


comments powered by Disqus