मुंबई गँगरेप : तिसऱ्या आरोपीलाही अटक, mumbai gang rape : police arrest third accused

मुंबई गँगरेप : तिसऱ्या आरोपीलाही अटक

मुंबई गँगरेप : तिसऱ्या आरोपीलाही अटक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई गँगरेप प्रकरणातील तिसरा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. याअगोदर दोन जणांना अटक करण्यात आली होती. हा तिसरा आरोपीही मुंबईतच लपून बसला होता. पण, अखेर तो पोलिसांच्या हाती लागलाय.

सिराज रेहमान असं या आरोपीचं नाव आहे..त्याला गोवंडी परिसरातून अटक करण्यात आलीय..याआधी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली होती. एकूण पाच आरोपीपैंकी तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागलेत. अजुनही या प्रकरणातील दोघे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. लवकरच या प्रकरणातील दोघा फऱार आरोपींना गजाआड करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, याआधी पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. भोईवाडा कोर्टाने ही कोठडी सुनावली. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिल्याची माहिती पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिलीय.

दरम्यान, पहाटे ३.०० वाजता गृहमंत्री आर आर पाटील यांनी एन एम जोशी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. अजूनही तीन आरोपींचा शोध सुरु आहे मात्र ते देखील लवकरच सापडतील असा विश्वास पोलिसांना आहे. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पेक्षा जास्त पथकं तयार करण्यात आली आहेत. ही पथकं मुंबई आणि परिसरात आरोपींचा कसून तपास करत आहेत.

मुंबईत महिला पत्रकारावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली गुरुवारी घडलीय. अजूनही याप्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 24, 2013, 19:32


comments powered by Disqus