मुंबई गँगरेप: आरोपींना सेशन कोर्टात केलं जाणार हजरMumbai Gang-rape: Confirmation of charges On Accused In Court

मुंबई गँगरेप: आरोपींना सेशन कोर्टात केलं जाणार हजर

मुंबई गँगरेप: आरोपींना सेशन कोर्टात केलं जाणार हजर
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबईत शक्ती मिल कंपाऊंडमध्ये फोटो जर्नालिस्ट तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आज आरोपींना सेशन कोर्टात हजर केलं जाणारेय. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं १४ सप्टेंबरला आरोपपत्र दाखल केलं होतं. जवळपास ६०० पानांच्या या आरोपपत्रात एकूण ८२ लोकांची साक्ष नोंदवण्यात आलीये.

फोटो जर्नलिस्ट आणि तिच्या मित्रानं ४५ मिनिटात शक्तीमील कम्पाऊंडचे २४० फोटो काढले होते. त्यावरुन हे दोघे ऑफिसच्या कामासाठीच शक्तीमील कम्पाऊंडमध्ये आले होते. घटनास्थळी मिळालेले कपड़े, आरोपींचे कपड़े आणि फ़ोटो जर्नलिस्टचे कपड़े, त्यांचा डीएनए रिपोर्ट, फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट, फ़ोटो जर्नलिस्टनं मॅजिस्ट्रेट समोर दिलेला जबाब, केमिकल अॅनालिस्ट रिपोर्ट, आरोपी आणि फोटो जर्नलिस्टच्या मोबाईल टॉवरचं लोकेशन, फोटो जर्नलिस्टला जागा साफ करायला लावलेली ओढणी, ज्या काचेच्या तुकड्यानं फ़ोटो जर्नलिस्टला धमकावण्यात आलं होतं. त्या बीअरच्या बाटलीचा काचेचा तुकडा आणि घटनास्थळावरून मिळालेले पुरावे या आधारावर क्राईम ब्रांचनं आरोपपत्र बनवलंय.

मुंबईतल्या महालक्ष्मी परिसरातल्या शक्ती मिलमध्ये महिला पत्रकारावर पाच नराधमांनी २२ ऑगस्टला बलात्कार केला होता. त्याला एक महिना पूर्ण होण्याआधीच मुंबई क्राईम ब्रांचनं या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय. हे प्रकरण जलद गतीनं चालावं आणि निकाल लवकर लागावा यासाठी फ़ास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं जाणारेय. यावेळी उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून पोलिसांची बाजू मांडणार आहेत.

दिल्लीत झालेल्या गँगरेप प्रमाणंच शक्ती मिलमध्ये महिला पत्रकारावर अमानुष बलात्कार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा सिद्ध होईल आणि त्यांनाही कठोर शिक्षा होईल, असा विश्वास मुंबई पोलिसांनी व्यक्त केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 23, 2013, 08:37


comments powered by Disqus