`मी पत्नीप्रमाणे राहिले!' लग्नास कोर्टाचा नकार, Mumbai High court Permission denied marriage

`मी पत्नीप्रमाणे राहिले!' लग्नास कोर्टाचा नकार

`मी पत्नीप्रमाणे राहिले!' लग्नास कोर्टाचा नकार
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

मी त्याच्यासोबत अनेक वर्ष पत्नीप्रमाणे राहत आहे. मला त्याच्याशी लग्न करायचेय, अशी मागणी करत एक याचिका महिलेने न्यायालयात दाखल केली. मात्र, कोर्टाने तिला फटकारत त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करु नकोस, असे बजवाले. तिला विवाहापासून रोखले.

विवाहित पोलीस अधिकाऱ्याशी लग्नगाठ बांधण्यासाठी निघालेल्या प्रेयसीला मुंबई उच्च न्यायालयाने ‘समज’ दिलेय. विवाहित असलेल्या पोलीस अधिकार्याधबरोबर लग्न करण्याची परवानगी मिळावी, अशी विचित्र मागणी करणारी एका महिलेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.

हा पोलीस अधिकारी विवाहित असून पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलेदेखील आहेत. त्यामुळे न्यायालय या महिलेची लग्नाची विनंती मान्य करू शकत नाही, असे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

तो आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून पती-पत्नीसारखे संबंध ठेवून आहोत. त्यामुळे मी स्वत:ला त्याची पत्नी म्हणून समजते. आपल्या या संबंधाचा न्यायालयाने सहानुभूतीने विचार करावा, तसेच आपल्याला त्याच्याशी लग्न करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही या महिलेने केली, परंतु न्यायालयाने त्यास नकार दिला.

कायद्यात तरतूद नसल्याने आपण दुसर्या विवाहाची परवानगी देऊच शकत नाही असे खंडपीठाने ठामपणे सांगितल्यानंतरही ही महिला जरादेखील खचली नाही. उलट न्यायमूर्तींनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून आपल्याला या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा दर्जा द्यावा अशी या महिलेने मागणी केली. निदान ‘दान’ म्हणून तरी आपल्या पदरात घाला, असे ती म्हणाली. कायद्यात तशा प्रकारची कोणतीही तरतूददेखील नाही. अशावेळी न्यायालय तुमचे म्हणणे कसे मान्य करू शकते, असा सवाल न्यायमूर्तींनी केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013, 11:13


comments powered by Disqus