मोदींच्या सभेवर दहशतवादी हल्ल्याचं सावटMumbai - High security for Modi`s rally may terror attack

मोदींच्या सभेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

मोदींच्या सभेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत आज नरेंद्र मोदींची भव्य सभा होतेय. मात्र मोदींच्या या सभेवर दहशतवादी हल्ल्याची छाया आहे.

मोदी हे विविध दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहेत. त्यातच मोदींच्या या सभेवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असं गुप्तचर यंत्रणांचे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळं मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलीय. वांद्रे-कुर्ला संकुलाला छावणीचं स्वरूप आलंय. तसंच संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.

५ स्तरांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे. प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणीही २ वेगवेगळ्या सिक्युरीटी चेकनंतरच सभेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 22, 2013, 08:59


comments powered by Disqus