Last Updated: Wednesday, November 7, 2012, 19:57
www.24taas.com, मुंबईआज संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे तसंच हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे ऑफिसमधून घरी परतण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सीएसटी स्टेशनवर हजारो प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
संध्याकाळी ५.३० ते ५.४५ च्या सुमारास सीएसटी- आसनगाव लोकल धावत असताना सीएसटीजवळच पेंटाग्राफ तुटल्याने रेल वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सीएसटीहून कल्याणला जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक धीमी झाली आहे. तसंच फास्ट ट्रॅकवरील ट्रेन स्लो ट्रॅकवर धावत आहेत. सीएसटी स्थानकावर हजारो प्रवाशांची गर्दी उसळलेली आहे.
दादरपासून रेल्वे वाहतूक सुरळीत चालू आहे. दादर ते कल्याण लोकल साधारण १५ मिनीटं उशिरा सुटत आहेत. रेल्वे वाहतूक रखडल्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाल्याचा दिसून येत आहे. बेस्ट बसेस आणि टॅक्सीसाठी लांबलचक रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाले आहेत.
First Published: Wednesday, November 7, 2012, 19:57