मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, Mumbai Local slower

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
www.24taas.com, मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक आजही विस्कळीत झालीये. सीएसटीकडे येणा-या आणि जाणा-या लोकल्स पंधरा ते वीस मिनिटे उशीराने धावतायेत.

कल्याण ते ठाणे आणि ठाण्यापासून घाटकोपरपर्यंत लोकल वाहतूक मंदावलीये. कळवा यार्डाचे काम अजुनही अपूर्ण आहे. यार्डाचं काम सुरु असल्यामुळं रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येतय.

रेल्वे प्रशासन लोकल वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत असल्याचं सांगत असलं तरी,काही लोकल्स अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असं काही प्रवाशांनी ` झी २४तास`ला सांगितलं.

शनिवारपासून कोलमडलेली मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल वाहतूक सेवा सलग चौथ्या दिवशीही १८ ते २० मिनिटे विलंबाने धावत होती. डाऊनपेक्षाही अप मार्गावरून लाखोंच्या संख्येने कामावर जाणा-या चाकरमन्यांना याचा फटका बसला.

सोमवारी रात्री अर्धा तास विलंबाने ही वाहतूक सुरू होती, तर मंगळवारी सकाळी अठरा मिनिटे विलंबाने लोकल धावल्या. या विलंबामुळे बहुतांशी लोकल गाड्यांमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत अप दिशांमधील गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी होती.

First Published: Wednesday, January 2, 2013, 09:11


comments powered by Disqus