मुंबईतील लोकल ट्रेनचे दरवाजे बंद !, Mumbai local train doors closed!

मुंबईतील लोकल ट्रेनचे दरवाजे बंद !

मुंबईतील लोकल ट्रेनचे दरवाजे बंद !
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतील लोकल ट्रेनचे दरवाजे हे बंद असावेत अशी मागणी रेल्वेपाठोपाठ आता राज्य सरकारनेही केलीये. लोकल ट्रेनच्या स्वयंचलित दरवाज्यांसाठी राज्य सरकारनेही पाठपुरावाही सुरु केलाय. मात्र जीवघेणी गर्दी असलेल्या लोकलचे दरवाजे बंद ठेवणं शक्य आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ऐन गर्दीच्या वेळी लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणा-या प्रवाशांचा अपघात होऊ नये यासाठी रेल्वे पाठोपाठ राज्य सरकारने स्वयंचलित बंद दरवाज्यांची मागणी केलीये. यामुळे धावत्या लोकलमधून पडून अपघात होण्याचे प्रमाण शून्यावर येईल आणि एकुणच रेल्वे प्रवाशांच्या अपघाताचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा कमी होईल असा दावा रेल्वे आणि राज्य सरकार करतंय. मात्र दरवाजे बंद असण्याबाबत प्रवाशांनी काहीशी नाराजी व्यक्त केलीये.

रेल्वे आणि राज्य सरकारचे बंद दरवाज्याबद्दलचे प्रस्ताव हे रेल्वे बोर्डाने गेले आहेत. केंद्रात नवीन सरकार येईपर्यंत यावर निर्णय होणं अवघड आहे. एकीकडे रेल्वे प्रवाशांच्या समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असतांना बंद दरवाज्याचा मुद्दा उपस्थित करत एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे हे निश्चित.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 07:53


comments powered by Disqus