मुंबई रेल्वेत प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक... , Mumbai local travel problem

मुंबई रेल्वेत प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवास म्हणजे जीवावरचा खेळच..प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक देणार्‍या रेल्वे प्रशासना विरोधात आज विविध रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रवासी संघटनांनी आंदोलन केले. रेल्वे प्रवास सुकर करा हीच प्रवाशांची मागणी होती.

मुंबईकरांना दररोज अशा खचाखच भरलेल्या, घुसमट, दमछाक करणा-या अवस्थेतून प्रवास करावा लागतो... सकाळ असो की संध्याकाळ... लोकलला गर्दी कायमचीच... या गर्दीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो...किंवा मोनिका मोरेसारखं अपंगत्व तरी येतं... लोकलची वाढती गर्दी पाहून या सगळ्याचं रेल्वे प्रशासनाला काही सोयरसुतक नसल्याचंच दिसून येतं. आणि याचाच विरोध म्हणून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात डेमॉक्रेटिक यूथ फेडरेशन अर्थात डाइफी आणि प्रवास अधिकार आंदोलन समिती अर्थात पासनं विविध रेल्वे स्थानकांच्या बाहेर अशआंदोलनं केली.

लोकल मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते मात्र या लाईफलाईनचा प्रवास दिवसेंदिवस अशक्यप्राय होत चाललाय. मुंबईतला रेल्वे प्रवास म्हणजे गर्दी...मग सकाळ असो वा संध्याकाळ....कायम लोकल प्रवाशांना गर्दीचा रोज सामना करावा लागतो. गर्दीच्या वेळी १ स्क्वेर फूटात प्रवास करतात तब्बल १० पेक्षा जास्त लोक प्रवासी. पण रेल्वे प्रशासनाला मात्र त्याचे काही वाटत नाही असेच वाढत्या गर्दीवरुन दिसते.. म्हणूनच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात डेमॉक्रेटिक यूथ फेडरेशन अर्थात डाइफी आणि प्रवास अधिकार आंदोलन समिती अर्थात पास ने विविध रेल्वे स्थानकांच्या बाहेर आंदोलनं केली.

एअर कंडीशनची हवा खात काम करणा-या वरिष्ठ रेल्वे अधिका-यांवर प्रवाशांचा रोष होता. त्रास कमी करण्यासाठी योग्य निर्णय घ्या अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केलीये. गेली अनेक मुंबईतला वर्षे लोकल रेल्वे प्रवास जीवघेणा बनलाय. मात्र रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ढिम्मपणे बघत बसलेत. प्रवाशांच्या संतापाचा कटेलोट होऊन स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याआधीच पावले उचलावीत अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होतेय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ

First Published: Friday, February 7, 2014, 21:56


comments powered by Disqus