मुंबईचे महापौर झाले नाराज...., MUMBAI MAYOR SUNIL PRABHU ANGRY

मुंबईचे महापौर झाले नाराज....

मुंबईचे महापौर झाले नाराज....
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-२ टर्मिनलच्या उदघाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत आपला नामोल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारं पत्र महापौर सुनील प्रभू यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग तसंच राज्यपालांना पत्र पाठवलंय.

अतिमहत्वाच्या व्यक्ती मुंबईत आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबईचे प्रथम नागरिक या नात्यानं मुंबईचे महापौर विमानतळावर जातात. राजशिष्टाचाराचा तो एक भाग असतो... मात्र टी - २ उदघाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौरांच्या नावाचा उल्लेख नाहीच, शिवाय त्यांना निमंत्रणही नाही.

स्थानिक आमदार, खासदारांचं निमंत्रण पत्रिकेत नाव आहे. हा मुंबईच्या सव्वा कोटी नागरिकांचा अपमान असल्याचं पत्र सुनील प्रभू यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 10, 2014, 10:55


comments powered by Disqus