Last Updated: Wednesday, June 18, 2014, 19:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई वन मेट्रोनं सकाळच्या वेळात प्रवास करणाऱ्यांसाठी सवतलीचा दर जारी केलाय. विक डेजमध्ये सकाळी साडेपाच ते 8 या वेळेत प्रवास करणाऱ्यांना यापुढे पाच रुपयांमध्ये कोणत्याही दोन स्थानकांदरम्यान प्रवास करता येणार आहे.
प्रवाशांनी सकाळच्या वेळात मेट्रोनं अधिकाधिक प्रवास करावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. उद्यापासून आठवड्याभरासाठी प्रायोगिक तत्वावर हे ‘हॅप्पी अवर्स’ प्रवाशांना मिळणार आहेत. मात्र हे सवलतीचं तिकिट घेतल्यास अर्ध्या तासात प्रवास सुरू करावा लागणार आहे.
स्मार्टकार्ड धारकांनाही ही सवलत असेल. सकाळी साडेपाच ते 8 या वेळेत मेट्रोमधून एक्झिट केल्यास त्यांच्या स्मार्टकार्डमधून पाच रुपयेच कापले जातील.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 19:35